Kallol Entertainment Home

Archive

Lagnabambaal

02/10/2024
Lagnabambaal

लग्नबंबाळ - लग्न करून लोकं सुखी होतात की लग्न न करता? शतकानुशतकं पडलेला हा गंभीर प्रश्ण अतिशय मार्मिक पणे हाताळलाय मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि सुहास गोसावी दिग्दर्शित लग्नबंबाळ ह्या नाटकात. लग्नानं स्त्रीच्या आयुष्याला सुंदर, अलौकिक असा पूर्णविराम लाभतो हे मेनका सहस्र्बुद्धेचं म्हणणं बरोबर की लग्न संस्था ही कृत्रिम व्यवस्था असून तो फक्त एक सोशियो इकॉनॉमिक व्यवहार आहे असं मानणारा शार्दूल शृंगारपुरे बरोबर? दोन तास हसवणारं नाटक जेंव्हा तुम्हाला विचार करायला लावतं तेंव्हा हे कोडं सुटतं की प्रश्नांचा गुंता अधिक वाढतो ते तुम्हीच ठरवा. कुसुम कला निर्मित कल्लोळ एंटरटेनमेंट सादर करत आहे "लग्नबंबाळ".